Sunday, August 22, 2010

विद्रोही संघटना व वास्तव

सध्याच्या काळी स्वत:ला सुधारणावादी, समाजसुधारक, विद्रोही, परिवर्तनवादी, निधर्मी, चळवळवादी, बहुजनवादी अशाच नाना प्रकारची विषेशणे स्वत:ला लावुन घेणारी बरीच मंडळी सध्या आपल्या आजुबाजुला आढळतील. याचे कारण म्हणजे सध्या वारेच यांच्या विचारांच्या दिशेने वाहत आहे यांना हवी असलेली परिस्थिती सध्या महाराष्ट्रात चालू आहे. "आरोप" हे या लोकांचे क्रमांक एक चे अस्त्र आहे. याच अस्त्राच्या आधारावर हिंदु धर्मावर, संस्कृतीवर, शिवचरित्रावर, वेद-वेदांत, देश, संत-महंत, महापुरुष यांच्यावर अनेक आरोप ही मंडळी करायला मागेपुढे पाहत नाहीत. अगदी यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर सावरकर हे स्वातंत्र्यविर नसुन ’संडासविर’ आहेत. हेडगेवार, टिळक ही देशद्रोही पिलावळे यांच्या दृष्टीने ठरतात, तर झांसीची राणी लक्ष्मीबाई या इंग्रजांच्या बटीक ठरता. ही झाली पहीली बाजू ज्यांनी या देशाची आजन्म सेवा केली ते यांच्या दृष्टीने देशद्रोही वगैरे ठरतात. दुसरी बाजू म्हणजे हे लोक कोणाला चांगले म्हणतात ?? तर ...औरंगजेबाला स्त्रि-दाक्षीण्यवादी असे विषेशण या लोकांनी लावले आहे. हिंदु-मुस्लिम दंगलीमध्ये हे नि:संकोचपणे मुसलमानांची बाजू उचलून धरतात. अफजलखान वधाचे चित्र लावण्यास विरोध करण्यामध्ये हेच लोक आग्रभागी असतात. म्हणजे सावरकर, हेडगेवार, राणि लक्ष्मिबाई, समर्थ रामदास, टिळक हे देशद्रोही आणि औरंगजेब, अफजलखान हे देशप्रेमी .. साधारण अशाप्रकारचे एक अभद्र समिकरण या स्वयंघोषीत समाजसुधारकांनी आज मांडलेले आहे. खरे तर यांच्या या समिकरणाला किती लोकांचा पाठिंबा आहे हा एक संशोधनाचाच विषय आहे.
या लोकांकडे प्रसिद्धी हे एक हत्यार आहे . आमुक-आमुक या एखाद्या सभेला पच-पन्नास लोक उपस्थित असले की पाच-पन्नास चे पाचशे-पन्नास करुन आपल्या समविचारी प्रसिद्धी माध्यमामध्ये याची बातमी द्यायची . हा एक रोजचा भातुकलीचा खेळ असावा याप्रमाणे चालत आहे. या विद्रोही वादी संघटनांच्या काही संघटना आहेत व या संघटनांवर कॉंग्रेस मधील काही ’बड्या’ नेत्यांचा वरदहस्त आहे. अगदी लहानातल्या लहान सभेसाठी या नेत्यांकडून यांना आर्थिक ओघ येत असतो तसेच उपस्थितांची संख्या जास्त दिसण्यासाठी हे ’बडे’ नेते आपल्या कार्यकर्त्यांना या संघटनांच्या कार्यक्रमांना पाठवत असतात व याचा मोबदला म्हणुन निवडणुकी वेळी या विद्रोही संघटनांचे कार्यकर्ते आपल्या ’बड्या’ नेत्याचा प्रचार करण्याच दंग असतात. अर्थात पैसे, भ्रष्टाचार, लाच-खोरी अशाप्रकारच्या लोकशाहीला काळीमा फासणारे प्रकार यावेळी सर्रास केले जातात.
हिंदु समाजामजामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मोठी जन-जागृती होत आहे. मग त्याला कारण मिरज दंगली सारखि प्रकरणे असोत, धुळे दंगली सारखी प्रकरणे असोत, काश्मिर मध्ये हिंदुंचे हनन , इस्लामी दहशतवाद , आणि ना जाणो किती अशा अनेक प्रकरणांमुळे हिंदु समाज हळू-हळू जागृत होत आहे. बेगडी धर्मनिरपेक्षतेला लात मारुन ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करनारे हिंदु तरुण तयार होऊ लागले आहेत. हेच हिंदुत्व अशाचप्रकारे वाढू लागले तर आपल्या उद्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल असे या देशातील काही अहिंदुंना वाटू लागले. वेग-वेगळ्या माध्यमांतून अगदी पतिकूल परिस्थितित सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असलेली हिंदुजागृती पाहून काही लोकांची झोप उडाली आणि याच कारणामुळे वामन मेश्राम (नवबौद्ध), जैमिनी कडू (ख्रिश्चन), व रफिक कुरेश(मुसलमान) या त्रिकुटाने मिळून हिंदुधर्म, हिंदु संस्कृती, देशप्रेमी संत-महंत-महापुरुष, हिंदुधर्मग्रंथ तसेच हिंदुसमाज यांच्या विरोधात ’बामसेफ’ हीम संघटना स्थापण केली, सध्याची मराठा सेवा संघ या संघटनेमागील बाबसेफ ही सुत्रधार संघटना आहे. ती दलित संघटना असल्यामुळे तिला मराठा संघाकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता नव्हती म्हणुन सुरवातीला ’मराठा महासंघ’ या मसाठा संघटनेचा वापर करून घेण्याचे प्रयत्न करुन घेण्यात आले. परंतु या प्रयत्नांना पुरेसे यश मिळत नसल्याचे दिसून आल्यावर या कटाच्या सुत्रधारांनी मराठा सेवा संघ या नावची वेगळी संघटना स्थापन केली आणि कळसूत्रीप्रमाणे पुरुशोत्तम खेडेकर यांस अध्यक्ष केले. या संघटनांच्या स्थापणे संबंधी मराठा विकास परिषदेने ऑगस्ट २००९ रोजी प्रकाशीत केलेल्या ’शिवरायांचा देशधर्म, पुरुषोत्तमांचा द्वेशधर्म’ या पुस्तिकेमध्ये श्री अशोक राणे यांचा एक परिच्छेद उल्लेखनिय आहे , तो असा.. "अयोध्या आंदोलनामुळे देशामध्ये हिंदुत्व पुनर्जागरणाला सुरवात झाली आणि त्याचा प्रभाव समाजीवनाच्या विविध क्षेत्रावर जाणवून प्रचंड हिंदुत्व जागरण झाले. त्यामुळे हिंदुत्वविरोधी कळपामध्ये खळबळ माजली व हिंदु समाजामध्ये जातीय संघर्ष उभा करणार्‍या चळवळी देशामध्ये सक्रिय झाल्या किंवा हिंदू समाजामध्ये जातीय संघर्ष निर्माण करणार्‍या संघटनांना खतपाणी घालण्याचे काम सुरु झाले. वर्ष १९९९ ते २००० या काळात हिंदुत्व हिंदुत्व जागरणामुळे गुजरातमधील डांग मध्यप्रदेशातील झाबुआ, ओरिसातील आनंदपूर येथील कमजोर हिंदुंची ख्रिश्चन मिशनरिंनी बाटवाबाटवी केली होती. तो ख्रिश्चन झालेला हिंदु समाज घरवापसी करुन हिंदु धर्मात पुनप्रवेश करु लागला. त्यामुळे ख्रिश्चन मिशनरी जगतामध्ये खळबळ निर्माण झाली व हिंदु समाजातील कमजोर वर्गाचे धर्मांतर करण्याऐवजी हिंदू समाजामध्ये केवळ जातीय संघर्ष निर्माण करण्याचे षडयंत्र रचले गेले. त्याचवेळेस सन २००१ मध्ये डरबन येथे विश्वसंमेलन झाले. त्यामध्ये w.c.c संघटनेच्या (world church council) नेतृत्वाखाली भारतीय दलित नेत्यांनी हजेरी सुद्धा लावली. त्यामुळे विद्रोही साहीत्य संमेलनाला महत्व आले. आणि त्यामधून वहारू सोनावणे यांनी ’आदिवासी हिंदु नाहीत’ अशी भूमिका जाहीर केली. दया पवार, लक्ष्मण माने यांना विदेशी पुरस्कार जाहीर झाले. महाराष्ट्रामध्ये मराठा सेवा संघाने ’मराठा जोडो’ यात्रा काढून हिंदु धर्म सोडण्याचे आवाहन मराठा समाजाला केले."
या संघटनांच्या कार्यपद्धतिविषयी संत श्री बाबुराव महाराज वाघ आपल्या ’हिंदुजागृती’ या पुस्तकात म्हणतात , ".....नंतर खोडेकर मराठा सेवा संघाचा अध्यक्ष होताच माने मराठा ’समाजाचे संघटन’ या गोंडस नावाखाली सर्व मराठा समाजास ब्राम्हणद्वेष, हिंदद्वेष, हिंदूधर्मद्वेष, हिंदूधर्म ग्रंथांचा द्वेष, वारकरी सांप्रदायीक संतांचा द्वेष, वारकर्‍यांचा द्वेष, विठ्ठलाचा द्वेष इत्यादी शिकवण देण्यास आरंभ केला. म्हणून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदु, हिंदूधर्म, हिंदूस्थान यांच्या रक्षणाकरीता अहोरात्र ३६ वर्षे संग्राम केला त्या हिंदुधर्माच्या विरोधात बामसेफ प्रणित मराठा सेवा संघ आणि त्याच्या उपसंघटना यांनी काम करणे हा शिवाजी महाराजांचा घोर अपमाण होय."
याचप्रमाणे प्राचार्य श्री अशोक बुद्धीवंत आपल्या एका लेखामध्ये मराठ्यांना आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा काढून आपली पोळी भाजू पाहणार्‍या तथाकथीत स्वयंघोषीत समाजसुधारकांबद्दल म्हणतात, "ज्या नेत्यांच्या घरात अनेक टर्म आमदारक्या आहेत, जे निवडणुकांवर कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक करतात, ज्यांच्याकडे आजच्या काळातही शेकडो एकर जमिनी आहेत, ज्यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी पडलेल्या आहेत, ज्यांच्या संघटनांमध्ये हिशोब न दिल्यामुळे फुटी पडलेल्या आहेत ती मंडळी जेव्हा गरिबीबद्दल आणि गरिबांबद्दल खोटय़ा कळवळ्याने लिहितात तेव्हा ते अपराधभावातून आलेले लेखन आहे असेच म्हणावे लागते." तर श्री सुनिल चिंचोळकर आपल्या समर्थ चरित्र : आक्षेप व खंडन या पुस्तकात एके ठिकाणी म्हणतात, "शिव्या देण्यासाठी अभ्यास करावा लागत नाही मात्र रचनात्मक लिहिण्यासाठी प्रतिभा व अभ्यास लागते या दोन्ही गोष्टिंचा या मंडळीकडॆ दुष्काळ